crime news- शिरढोण येथील शेतमजूर महिला खोत मजुरी करून दुपारी घरी परतत असताना शनिवारी (दि. २३) किशोर माणगावे यांच्या शेतात अज्ञाताने मानेवर धारदार (weapon) शस्त्राने पाठीमागून वार करून खून (murder) केला होता. घटनास्थळी कुरुंदवाड पोलिसांसह अप्पर पोलीस अधीक्षक अश्विनी गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी भेट देऊन तपास गतिमान झाल्याने अज्ञात मारेकऱ्याच्या लवकरच मुसक्या आवळणार अशी आशा मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांना होती.
मात्र, दोन आठवडे उलटले तरी अद्याप खुनी (murder) शोधण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश न आल्याने व आरोपी मोकाटच राहिल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
-------------------------------
Must Read
1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा
--------------------------------
आरोपी मोकाट असल्याने शेतमजूर महिला शेतात मजुरीसाठी जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा, अशी नागरिकांतून मागणी होत असून विविध शेतमजूर संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.