crime news ichalkaranjicrime news- इचलकरंजी शहरातील वाढत्या गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलिस यंत्रणेने ‘मोका’सारखी टोकाची कारवाई सुरू केली. शहरातील तब्बल १६ टोळ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर इचलकरंजीत गुन्हेगारी ठळकपणे चर्चेत आली.

या कारवाईद्वारे सुमारे दीडशेहून अधिक गुन्हेगारांची (criminals) रवानगी कारागृहात केली; पण अलीकडे शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे या कारवाईचे भय आता कमी झाले की काय, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे. शहराच्या औद्योगिक विकासासाठी गुन्हेगारीवर नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नवीन गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव वाढण्यापूर्वीच त्यांचा वेळीच बीमोड करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे.    

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

अवैध धंद्यातून शहरातील विविध भागांत गुन्हेगारी (criminals) टोळ्यांचा उपद्रव वाढत गेला. इचलकरंजीतील गुन्हेगारीची चर्चा वाढतच राहिली. अखेर पोलिसांना गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’सारखी धडक कारवाई करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.   

एक नव्हे, दोन नव्हे १६ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. यातील काही टोळ्यांवर केलेल्या कारवाया कायद्याच्या कसोटीवर टिकल्या नसतील, पण वाढत्या गुन्हेगारींवर ‘मोका’ कारवाईचा पोलिसांचा परफेक्‍ट उतारा लागू झाला. हळूहळू पुन्हा अवैध धंद्याच्या माध्यमातून नवीन यंत्रणा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात पुन्हा त्यांचा उपद्रव वाढण्याची भीती अधिक आहे. ‘मोका’ कारवाईची धास्ती कायम राहण्याची गरज आहे. याबाबत ठोस कृती पोलिस यंत्रणेकडून पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे.