sports news- भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरु असलेल्या  पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं 150 रनचा टप्पा पार केला आहे. रुटनं यावर्षी सलग तिसऱ्या टेस्टमध्ये 150 चा टप्पा पूर्ण केला आहे. तर या वर्षातील पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या (test cricket) बेन स्टोक्सनं (Ben Stokes) देखील अर्धशतक पूर्ण केलं आहे. स्टोक्सनं त्याचं अर्धशतक  23 वं अर्धशतक 73 बॉलमध्ये 6 फोर आणि 2  सिक्सच्या मदतीनं पूर्ण केलं.

भारतीय बॉलर्सची निराशा

यापूर्वी दुसऱ्या दिवशी (test cricket) इंग्लंडनं 3 आऊट 263 या धावसंख्येवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या  जो रुटनं बेन स्टोक्सच्या मदतीनं इंग्लंडचा डाव सुरु केला. या दोघांनी पहिल्या सत्रावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. त्यांच्या भक्कम बॅटिंगपुढं भारतीय बॉलर्सना यश मिळालं नाही. इंग्लंडनं लंचपर्यंत 3 आऊट 355  रन केले आहेत.-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

जो रुटनं पहिल्या दिवशी त्याच्या करियरमधील 20 वी सेंच्युरी 164 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं पूर्ण केली. शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी करणारा तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील नववा तर इंग्लंडचा तिसरा बॅट्समन आहे.भारताकडून जसप्रीत बुमराहनं दोन तर आर. अश्विननं एक विकेट घेतली. अन्य कोणत्याही बॉलरला विकेट घेण्यात आजवर अपयश आलं आहे.