'Instagram Reels' feature
शॉर्ट व्हिडिओ(new app)अ‍ॅप टिकटॉक (TikTok) हे 2020 मधील सर्वात प्रसिद्ध अ‍ॅप राहिले आहे. मागच्या वर्षी भारत-चीन सीमा वादानंतर (Indo-China border dispute) या चीनी अ‍ॅपला भारतामध्ये बॅन करण्यात आले. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर त्याची कमतरता दूर करण्यासाठी भारतामध्ये अनेक अ‍ॅप्स सुरु करण्यात आले.

यामध्ये(new app) 'Mitron', 'Moj' आणि 'Triller' यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. ऐवढेच नाही तर सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मने देखील अशाच पद्धतीने शॉर्ट व्हिडिओ अनुभवासाठी नव-नवीन फीचर्स लॉन्च केले. यामध्ये फेसबुकचा 'Short Video', युट्यूबचा 'Shorts' आणि इन्स्टाग्रामचा 'Reel' इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. 
सध्या या सर्वामध्ये इन्स्टाग्रामचे Reel फीचर सर्वात जास्त लोकप्रिय झाले आहे. अनेक युजर्स 'Reel' व्हिडिओ तयार करुन  शेअर करत आहेत. सध्या लाखो युजर्स(new app) इन्स्टाग्राम 'Reel' फीचरचा वापर करत आहेत. तुम्ही  इन्स्टाग्रामचा वापर करत असाल तर Reel व्हिडिओ पाहिले असतीलच.Reel व्हिडिओ तयार करण्याची तुमची इच्छा होत असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की या फीचरचा वापर कसा करायचा तर हा लेख तुम्हाला मदत करेल. आज आम्ही तुम्हाला Reel व्हिडिओ कसा तयार करायचा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.