marriage event


पुण्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगचा अभाव, विनामास्क फिरणारी नेतेमंडळी असे चित्र या लग्नसोहळ्यात दिसून आले. त्यामुळे नियम फक्त (social distancing) सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्यात सर्वसामान्य नागरिकांवर प्रशासन बंधने घालत आहे. तसेच कालपासून नाईट कर्फ्यूची (curfew) घोषणा केली आहे. लग्न सोहळ्यासह सर्व राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सर्व नियम लागू असतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. 

---------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

मात्र ही घोषणा झाल्या दिवशीच या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग (social distancing), मास्कचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. एकीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी गर्दी करणे टाळा अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला असताना थेट राजकारण्यांकडून हे सगळे नियम धाब्यावर बसवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील हडपसरमधील लक्ष्मी लॉन्स यथे महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी देशमुख यांचा विवाह सोहळा रविवारी (दि. 21) थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आदी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. उपस्थित असलेल्या अनेकांनी स्टेजवर जातानाही मास्क घातलेला नव्हता. तर काही लोकांनी मास्क हनुवटीवर घेत फोटोसाठी पोज दिली. याला वधू वरांसोबत धनंजय महाडिकदेखील अपवाद ठरले नाहीत. नियमांचे पालन न झाल्याने आता प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.