Coronavirus Cases in Maharashtra


महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus Cases in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. अकोला आणि अमरावती हे जिल्हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट (hotspot) बनू लागले आहेत. यवतमाळ जिल्हातही परिस्थिती वेगळी नाही आहे. राज्य सरकारकडून (state government) वेळोवेळी याबाबत नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. याठिकाणी वाढणारी रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे. कोरोनाची ही शृंखला तोडायची असेल तर प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याचा पॉझिटिव्हिटी दरही गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढला आहे.संपूर्ण राज्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 8.8 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.76 टक्के एवढा आहे.

अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 32 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 24 टक्के आहे.अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 48 टक्के असून आठवड्याचा 35 टक्के आहे तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

राज्यात (state government) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन 'एसएमएस' चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा, असे ट्वीट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण (hotspot) वाढवावे आणि एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा खाली आणावा असे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती टोपेंनी दिली