corona-patients-is-increasingऑनलाइन टिम:

जिल्ह्यात शुक्रवारी गेल्या 24 तासांत 22 नवे रूग्ण आढळले असून त्यात शहरातील 13 रूग्णांचा समावेश आहे. कोरोना (Corona) मृत्यू दर कमी झाला असला तरी रूग्णसंख्या वाढू लागली आहे. परिणामी सप्ताहभरापुर्वी 100 च्या आत असलेली सक्रीय रूग्णसंख्या 134 झाली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक (Corona restrictive) नियमावली प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात बळींची संख्या 1727 झाली असून गुरूवारी सक्रीय रूग्ण 96 होते. सप्ताहभरात कोरोनाने (Corona)  दोघांचा मृत्यू (Death) झाला. शुक्रवारी 22 नवे रूग्ण मिळाले. दिवसभरात 678 जणांची तपासणी केली. चौघे कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48215 झाली आहे.  

----------------------------

Must Read

------------------------------

शेंडा पार्क येथील लॅबमधून शुक्रवारी 651 रिपोर्ट आले. त्यातील 636 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 54 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 109 रिपोर्ट आले, त्यापैकी 96 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 0, गगनबावडा 1, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहर 13 व अन्य 4 असे 22 रूग्ण आहेत. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजार 78 झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.  दरम्यान, गेल्या दोन दिवसांत शहरातील कोरोनाचे नवे रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात नवे रूग्ण कमी आहेत. गुरूवारी ते निरंक होते. शुक्रवारी तीन तालुक्यात प्रत्येकी 1 नवा रूग्ण आढळला.