ऑनलाइन टिम:
इचलकरंजी:गेल्या बारा दिवसापासून कोरोनामुक्त झालेल्या वस्त्रनगरीमध्ये गुरूवार ता.११ रोजी यशवंत कॉलनीतील ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये कोरोनाने (corona) पुन्हा एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
------------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष शुक्रवार,12 फेब्रुवारी २०२१
2)उत्कृष्ट जिल्ह्यांना ५० कोटींचा अतिरिक्त निधी- अजित पवार..!!
3) गावभागात महिलांचा रास्तारोको...!!!
-------------------------------
कोरोनामुळे संपूर्ण जगभरासह भारतात मोठा हाहाकार माजला होता. कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना (corona) रूग्णांची संख्या लक्षणीय झाली होती. जिल्ह्यात इचलकरंजी शहर हे हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे शहरवासियामध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली होती.