self-immolationcrime news- आत्मदहनाचा प्रयत्न केला. शशिकांत लक्ष्मण खोत (रा. कागल वेस हुपरी) असे त्याचे नाव आहे. उपस्थित नगरसेवक, अधिकारी व नागरिकांच्या प्रसंगावधानाने शशिकांतचा आत्मदहनाचा (suicide)प्रयत्न अयशस्वी ठरला.

दरम्यान, घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या खोत याच्या भावाची महिला अधिकाऱ्याशी जोरदार शिवीगाळ व बाचाबाची झाली. याप्रकरणी हुपरी पोलिसांत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शशिकांतसह भाऊ चंद्रकांत याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे पालिका परिसरात खळबळ उडाली होती.


संशयित शशिकांत खोत याने सकाळी कर अधिकारी अश्विनी अडसूळ यांच्याकडे उतारा देण्याची मागणी केली. त्या वेळी अधिकारी अडसूळ यांनी पाणीपट्टीचे सहा हजार थकीत असून उतारा देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून मग सांगतो, असे सांगितले.


---------------------------

1) पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने यवतमाळमध्ये 12 चिमुकले रुग्णालयात


2) Budget 2021 : आजच्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळालं? वाचा ठळक मुद्दे


3) सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली – चिदंबरम


------------------------------


त्यानंतर शशिकांत याने बाहेर जात आरडाओरडा करत व्हरांड्यात कॅनमधून आणलेले रॉकेल अंगावर ओतून (suicide) घ्यायला सुरुवात केली. हा प्रकार समजताच अधिकारी, नगरसेवक व इतरांनी तत्काळ धाव घेत शशिकांत यास अटकाव करत हातातून कॅन, आगपेटी हिसकावून घेतला.


दरम्यान, खोत याचा भाऊ घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करत होता. ही बाब समजताच अधिकारी अडसूळ यांनी त्यास मज्जाव करत मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दोघांत झटापट, तसेच बाचाबाची झाली. अचानकपणे उद्भवलेल्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. अधिकारी अश्विनी अडसूळ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी पोलिस ठाण्यात उपस्थित होते.