Contaminated water


इचलकरंजी येथील सातपुते गल्लीतील नळाला दूषित पाणी (Contaminated water) येत आहे. कामगार नेते सदा मलाबादे यांनी दूषित पाण्याची बाटली थेट नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या टेबलवर ठेवली. याबाबत तातडीने उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. 

येथील सातपुते गल्लीतील 10 ते 12 नळांना दूषित पाणी (Contaminated water) येत आहे. त्यामुळे नागरिकांसह मलाबादे यांनी ही बाब आज पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. बाटलीतून दूषित पाणी आणून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी  (water supply) देण्याची पालिकेची जबाबदारी असताना दूषित पाणी दिले जात असल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. 

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना नगराध्यक्षा स्वामी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या. जलवाहिनीला गळती लागल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यामुळे गळती शोधून ती दूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी सांगितले. या वेळी जल अभियंता अंकिता मोहिते, शाखा अभियंता बाजी कांबळे उपस्थित होते.