Containment zoneऑनलाइन टिम :

जिल्ह्यात कोरोना काळात रूग्ण सापडला, की तो परिसर कंटेन्मेंट होत होता. कोरोना (Covid) कमी झाला, लस आली, अन् सारी यंत्रणा शिथील झाली. दीड महिन्यांत रूग्णसंख्या वाढली, पण त्या तुलनेत कंटेन्मेंट झोन झालेच नाहीत. त्यामुळे कोरोना रूग्णांत (patients) वाढ होत आहे. लॉकडाऊनच्या अल्टीमेटमनंतर यंत्रणा सक्रीय झाली. जिल्ह्यात ग्रामीण भागात 40 रूग्ण अन् अवघे 5 कंटेन्मेंट झोन आहेत. शहरामध्ये रूग्ण वाढत असताना  कडे झालेले दुर्लक्ष धोक्याचा इशारा देत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला. तो पुण्यातून आला होता. त्यानंतर कोल्हापुरात कोरोनाचे रूग्ण (patients) वाढू लागले. कोरोना रूग्णांसाठी सीपीआर हॉस्पिटल, आयजीएम हॉस्पिटल, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय आयसोलेटेड केली. एप्रिल-मे महिन्यात कोरोना रूग्णांनी दुहेरी आकडा गाठला. दरम्यानच्या काळात रूग्ण सापडला की त्याला होम, इन्स्टिट्युशनल कोरोंटाईन केले गेले. त्यापुढे जाऊन त्याच्या कुटुंबातील सदस्यांची, त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली. अगदी रूग्ण सापडलेला परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला.

जूनमध्ये कोरोना रूग्णांचा आकडा शेकड्यावर गेला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड (Community spread) झाला, अन् प्रतिदिन पॉझिटिव्ह रूग्णसंख्या हजार, बारांशेंवर पोहोचली. कम्युनिटी स्पेड रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने कंटेन्मेंट झोन  करण्यात आले. यामध्ये शहरात 200 मीटर तर ग्रामीण भागात 500 मीटरचा परिसर सील केला गेला. 7 ते 14 दिवस हे कंटेन्मेंट झोन राहिले. काही वेळा अगदी 7 किलोमीटर परिसरातील गावांसाठीही कंटेन्मेंट झोन झाले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचा धसका घेतला होता.

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात बाहेरील व्यक्तीला आत आणि आतील व्यक्तीला बाहेर जाण्यास मनाई होती. फक्त अत्यावश्यक सेवा या भागात पुरवली जात होती. ऑक्टोबरनंतर कोरोनाची साथ हळूहळू नियंत्रणात आली. नोव्हेंबरमध्ये आयसोलेटेड हॉस्पिटल (Hospital) नॉन कोरोना रूग्णांसाठी 50 टक्के खुली झाली. केअर सेंटर हळूहळू बंद झाली. डिसेंबरमध्ये लस आली, प्रत्यक्षात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली अन् नवे रूग्ण दिसत असतानाही कंटेन्मेंट झोनकडे दुर्लक्ष झाले.

ग्रामीण भागात एखादं दुसरा रूग्ण मिळत होता, केअर सेंटर बंद झाल्याने असे रूग्ण जिल्हा, उपजिल्हा रूग्णालयांत येत होते. तेथेच त्यांच्यावर उपचार (Treatment) झाले, पण रूग्ण सापडलेला भाग कंटेन्मेंट झोन जाहीर झाला नाही. दीड महिन्यात यंत्रणेत आलेल्या शिथीलतेचा हा परिणाम सोमवारी दिसून आला. जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या 160 असताना प्रत्यक्षात कंटेन्मेंट झोन मात्र अवघे पाचच दिसून आले. यासंदर्भात तालुका स्तरावर चौकशी करता काहींनी याची नोंदच ठेवली नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोनची यादी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यात दीड महिन्यात यंत्रणेत शिथिलता,नवे रूग्ण मिळाले, पण कंटेन्मेंट झोन नाहीच,जिल्ह्यातील अधिकतर तालुक्यातील चित्र,शहरात रूग्णांत वाढ, कंटेन्मेंट झोन नाहीच,रूग्णांची माहिती घेत कंटेन्मेंट झोनची यादी