salman khan


ऑनलाइन टिम:

काळवीट शिकार आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. जोधपूर सत्र न्यायालयात गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सलमानला दिलासा दिला. खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी राजस्थान सरकारने सलमानविरोधात (firearms license) न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सलमानला दिलासा देताना ती याचिका फेटाळली.

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सलमान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चित्रपटातील काही कलाकारांनी राजस्थानमध्ये काळवीट शिकार केली होती. याप्रकरणी २०१८ पासून जोधपूर सत्र न्यायालयात खटला सुरु होता.

------------------------------

Must Read

२०१८ मध्ये सलमानला जोधपूर सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात सलमानने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, जिल्हा व सत्र न्यायालयानेदेखील त्याची शिक्षा (firearms license) कायम ठेवत सर्शत जामीन मंजूर केला होता. त्यामुळेच सलमानच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

२०१८मध्ये न्यायालयाने ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सलमान खानने काळवीट हत्या प्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. सलमान खानने न्यायालयाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होतं. सलमानसोबत घटनास्थळी हजर असलेले सलमानचे साथीदार सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे निर्दोष सुटले आहेत.