राज्यपाल नियुक्त आमदाराच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्यावर वाद आहे. तर दुसरीकडे 'असा विक्षिप्त व्यक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाला आहे' अशा शब्दांत काँग्रेसच्या (Congress) फायरब्रँड नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी टीका केली आहे.

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे आमदार विक्रम सावंत यांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलत असताना यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली.'देशाची राज्य घटना ही सर्वोच्च आहे, पण राज्य घटनेवर प्रश्न उपस्थितीत करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच राज्यपालांनी प्रश्न विचारला. त्यांच्यासारखी विक्षिप्त व्यक्ती राज्यपालपदी विराजमान झाली आहे' अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली,असं वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिले आहे.

तसंच, 'राज्यासाठी जे काही मूलभूत अधिकार असतात त्या निर्णयातही सध्या बाधा आणली जात आहे. राज्य घटनेमुळे संपूर्ण देश हा एकत्र जोडलेला आहे. पण त्यावरच राज्यपाल हे प्रश्न उपस्थित करत असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला प्रश्न विचारणारी ही व्यक्ती संविधानाचे पालन करते का? असा परखड सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारला.

राज्याच्या राज्यपालपदी हा विक्षिप्त माणूस बसला आहे, माझे विधान आवर्जून दाखवावे, अशी विनंतीच यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना केली होती. या कार्यक्रमात कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते.