devendra fadnavisऑनलाइन टीम- 

politics news- देशातील सेलिब्रिटींच्या भूमिकेवरून राजकीय नेत्यांमध्ये सुरू झालेलं शाब्दिक युद्ध थांबताना दिसत नाही. अभिनेते अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग व चित्रपट बंद पाडण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर ही शाब्दिक चकमक आणखी वाढली आहे. पटोले हे प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे.

'सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ, विपक्ष का नेता तो हुआ...' याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडं वक्तव्य करीत असतात. त्यांचं वक्तव्य फारसं मनावर घेण्याचं कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे. त्यांच्या मनातील भावना व्यक्त केली आहे. मी तसं केलं तर भाजपच्या नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय?,' असा सवाल पटोले यांनी केला (politics news) आहे.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

इंधन दरवाढीच्या (fuel price) मुद्द्यावरून नाना पटोले यांनी काल अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर तोफ डागली होती. 'काँग्रेसप्रणित यूपीएचे सरकार हे लोकशाही मार्गाने चालणारे, संविधानावर चालणारे सरकार होते. त्यामुळंच अमिताभ, अक्षयसह असंख्य सेलिब्रिटी सरकार विरोधात आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. भाजपच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या या अभिनेत्यांचे चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून फडणवीस यांनी पटोले यांच्यावर टीका केली होती.