मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल १ फेब्रुवारीपासून सुरू झाली, मात्र पहिल्या दिवशी वेळेमर्यादेमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तिकीट (railway ticket) खिडक्यांवर प्रवाशांच्या रांगा हाेत्या. पण, वेळ चुकल्याने अनेकांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे काहीसे गाेंधळाचे (Confused) चित्र हाेते.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

सर्वसामन्यांना प्रवाशांना तीन टप्प्यात रेल्वे प्रवास करता येईल. रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत; दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते दिवसाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वसामान्य जनतेला सकाळी ७ ते  दुपारी १२ ते दुपारी ४ ते ९ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवाशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे, तर रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी काही व्यवस्था केली आहे.

मुंबई रेल्वे प्रवासी (railway ticket) संघाचे अध्यक्ष मधु कोटीयन म्हणाले की, सर्वांसाठी लोकलच्या पहिल्या दिवशी अपवाद वगळता स्थानकांमध्ये तिकिटासाठी रांगा किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेत गर्दी वाढली असे नव्हते. गेल्या काही दिवसांत जी गर्दी असते तीच गर्दी आजही पाहायला मिळाली. यामध्ये अनेक प्रवाशांच्या मनात अजूनही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे ते रेल्वे प्रवास करणे टाळत आहेत. तसेच सामान्य प्रवाशांना जी वेळ दिली आहे ती चुकीची आहे. त्यामुळे लोकल सुरू होऊनही चाकरमान्यांना बस, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. काहीजणांनी तर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. काही दिवसांनंतर गर्दी वाढेल. 

पहिल्याच दिवशी  ३९६ फुकटे प्रवासी

विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर २७५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २३७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. विनातिकीट ३९६ प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून एकूण १ लाख ०४ हजार २७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

मास्क बंधनकारक,  तिकीट तपासणीवर भर

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर लोकलमधून (railway ticket)  उतरणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे पथक आणि लोहमार्ग पोलीस पथकांने विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांना दंड आकारला. 

सुरक्षित अंतर नाहीच

वेळमर्यादेमुळे अनेक स्थानकांत कमी प्रवासी होते. मात्र, दादर तसेच नालासोपारा येथे तिकिटासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सुमारास नालासोपारा, दादर स्थानकात गर्दी होती. ताेंडावर मास्क असले तरी प्रवाशांनी सुरक्षित अंतर राखलेले नव्हते.  

संध्याकाळी ६ पर्यंत मध्य रेल्वेवरून १४.५ लाख जणांचा प्रवास

मध्य रेल्वे मार्गावर २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १० लाख, तर २४ तासांत अंदाजे १३ लाख जणांनी प्रवास केला होता, तर १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४.५ लाख जणांनी प्रवास केला. यामध्ये रात्री उशिरापर्यंत ५ ते ६ लाख प्रवासी वाढण्याची शक्यता आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ७ लाख आणि २४ तासांत ९.५ लाख जणांनी प्रवास केला, तर १ फेब्रुवारी रोजी ६ पर्यंत ११.५ लाख जणांनी प्रवास केला. 

तीन मिनिटे उशीर झाल्याने तिकीट नाही

रेल्वे स्थानकावर पोहोचण्यास मला केवळ तीन मिनिटे उशीर झाला. परंतु बरोबर सात वाजताच रेल्वे स्थानकात सर्वसामान्यांना प्रवेश बंद केल्याने मला स्थानकात प्रवेश दिला नाही. यामुळे माझे तिकिटाचे पैसेदेखील वाया गेले. प्रशासनाने रेल्वे सुरू करताना वेळेची घातलेली अट अत्यंत चुकीची आहे.   

वेळेचे बंधन नकाेच

काेराेना नियंत्रणात येत आहे. सर्व नियमांचे पालन करून सामान्यांसाठी रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू करावी. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता बाइक प्रवास सर्वांना परवडतोच असे नाही. यामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता रेल्वे सेवेला वेळेचे कोणतेही बंधन घालू नये.