uddhav thackeraypolitics news of india- राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे, यातच जर लोकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना विरोधकांसह सहकारी पक्षांचेही कान टोचले आहेत. लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपावर(BJP) निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर टीका करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) म्हणाले की, मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं, आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते साफ खोटं आहे, आफ्रिकेतून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा अशा भाषेत त्यांनी टीका केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण होते, लसीकरणात महाराष्ट्राचा नंबर देशात सर्वात शेवटचा का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, संचारबंदी आणि लॉकडाऊन असे इशारे देऊन काही फायदा होणार नाही, स्वतःच्या अपयशाबद्दल जनतेला दोष देऊ नका असा टोलाही अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना (politics news of india) लगावला.

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

देशातून साऊथ आफ्रिकेत पाठवलेल्या कोरोना लसींचे डोस पुन्हा भारतात पाठवण्यात आले आहेत, या लसीचे डोस देशासाठी उपयोगी ठरतील, तसेच आणखी काही डोस राज्याला मिळणार आहेत, त्यामुळे ते डोस मिळाल्यावर सामान्य नागरिकांना लसीकरण करण्यात येईल.(CM Uddhav Thackeray Statement on Corona Vaccine)  

राज्यपालांसह विरोधक आणि सहकारी पक्षांनाही टोले

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांसह विरोधक आणि सहकारी पक्षांचेही संवादात एक प्रकारे कान टोचले. अलीकडे कोविड योद्धयांचा सत्कार सुरू झाला आहे. एकीकडे कोविड योद्धांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे का बंद, ते का सुरू नाही, अशा भूमिका घेणाऱ्यांनी केलेले कार्यक्रम थोतांड आहेत. आपण कोविड योद्धे बनू शकलो नाही तरी किमान कोविड दूत तरी बनू नकात, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यपालांच्या उपस्थितीत कोविड योद्धयांच्या सत्काराचे कार्यक्रम नियमितपणे होत असतात. त्याकडे हा अंगुली निर्देश मानला जात आहे. तर, लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत, म्हणत भाजपला सुनावले होते.

 “मी जबाबदार" ही  मोहीम

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखले सुद्धा पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत  त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वानी पार पाडण्यासाठी " मी जबाबदार" ही  मोहीम सुरु करीत आहोत असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले