close response in shirol taluka.


ऑनलाइन टिम:

अवाजवी पाठवण्यात आलेली घरगुती वीज बिले (Electricity bills) त्वरित दुरुस्त करून मिळावी व्याज माफ करावे यासह अन्य मागण्यासाठी शिरोळ तालुका बंदची हाक आंदोलन अंकुश ने दिली होती. यास शिरोळ शहर कडकडीत बंद पाळून प्रतिसाद दिला तर तालुक्यातील अन्य गावात अल्प प्रतिसाद मिळाला आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे अभिजीत पाटील उदय उगले विकास शशिवरे भूषण गंगावणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

गेले आठवडाभर महावितरणाकडून वीज बिल वसुली साठी वेठीस धरले जात असून वीज ग्राहक आर्थिक अडचणीत आहे हे माहित असूनही बिल भरा  (Electricity bills) नाहीतर वीज कनेक्शन कट करतो असे धमकाऊन जोर जबरदस्तीने वीज बिल वसुल केली जात आहेत. राज्य शासनाने वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडून तर दिले आहेच पण थकीत बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन काळातील आलेली भरमसाठ बिले चुकीचे आकारण्यात आलेले इतर कर बेकायदेशीर आकारण्यात आलेला स्थिर आकार आणि १८ टक्के व्याज, दंड व्याज आकारून आलेली बिल दुरुस्त न करता भरा म्हणून ग्राहकांवर होत असलेला अन्याय आहे. 

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

त्याचबरोबर ज्या ग्राहकांनी वीज बिलाच्या तक्रारी (Complaints) केल्या आहेत त्यांची ही कनेक्शन बळजबरी ने कट करणे तसेच घरगुती वीज ग्राहकांना नोटीस न काढता शिरोळ तालुक्यातील काही गावात वीज कनेक्शन कट करण्याच्या महावितरणाच्या बेकायदेशीर कृती विरोधात शिरोळ तालुका बंदची हाक आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुगे  यांनी दिली होती. जयसिंगपूर येथील महावितरणच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.