sharad pawarpolitics news- कोथरूड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मास्क, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गळाभेटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले, राजकीय विचार वेगवेगळे असणारे मित्र जरी एकमेकांवर टीका (political criticism) करीत असले तरी समोर आल्याबरोबर एकमेकांशी प्रेमाने वागतात. 

आम्हाला आमचे काम वाढवायचे असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करावीच लागते. त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही. मात्र, पवार यांच्यासमोर आल्यावर मी त्यांना  नमस्कार करणारच.  अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------

लोकसभा आणि राज्यसभेत जेव्हा कृषिविषयक कायदे मंजूर झाले, तेव्हा पवार राज्यसभेत हजर नव्हते. त्यांना जर या कायद्यांवर चर्चा व्हावी असे वाटत होते, तर मग त्यांनी राज्यसभेत हजर राहायला हवे होते.  (politics news)

मात्र, त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे. ते जाणीवपूर्वक कृषी कायद्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. शिवसेनेने तर लोकसभेमध्ये पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार (political criticism) टाकला. भाजप सरकारला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही पाटील यांनी केला. आता न्यायालयाने दीड वर्षासाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पवार यांनी शेतकर्‍यांना रस्त्यावरून उठण्याचे आवाहन करावे, असेही ते म्हणाले.