Chimurda dies in leopard attack.ऑनलाइन टिम :

तडवळे ता. ३२ शिराळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack) ऊसतोड मजुराच्या सुफीयान शमशूद्दीन शेख या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपचारासाठी शिराळा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. वनविभागाकडून (Forest Department) त्याच्या कुटुंबाला तातडीची १५ लाख रूपये मदत जाहीर केली आहे.

----------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

ऊसाच्या फडात पुढे ऊसतोड चालू असताना, पाठीमागे असणाऱ्या एक वर्ष वयाच्या चिमूड्याच्या मानेला धरून बिबट्या ऊसाच्या फडात घेऊन गेला. ऊसतोड मजूरांनी आरडाओरडा करून मुलाची बिबट्याच्या (leopard attack)  तावडीतून सुटका केली. मात्र या हल्ल्यात (attack) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.