pavangadऐतिहासिक (historical) प्रतिपन्हाळगड म्हणुन प्रसिद्ध असलेल्या पावनगडावर उत्खनन करताना आज शिवकालीन तोफगोळे सापडले. त्यामुळे अजुन या उत्खननात काय सापडते याची उत्सुकता शिगेला लागली आहे.

पावनगड हा पन्हाळा नगरपरिषदेच्या हद्दीतील एक भाग आहे. गडावर अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था गडावर (fort) येवुन स्वच्छता मोहिम राबिवत असतात. अशाच एका संस्थेच्यावतीने पावनगडावर दिशादर्शक फलक बसवत असताना शिवकालीन तोफगोळे सापडले. अंदाजे शंभरच्या आसपास हे तोफगोळे असल्याची माहिती समोर आली आहे. सदरचे तोफगोळे गडावर सापडल्याने आणखी काहीतरी सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याकडे पुरात्त्वविभाग, नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.

पन्हाळा

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

दरम्यान,पावनगड (historical) हे पुरात्त्व विभागाच्या अखत्यारित्य येत आहे.या उत्खननाला परवानगी नेमकी दिली कोणी हे देखील पाहणे गरजेचे आहे. तरी देखील शिवकालीन तोफगोळे सापडल्याने आणखी संशोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे.