crime newsऑनलाइन टिम:

crime news- विक्रोळी -ठाणे मार्गावर एका टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेला १ हजार ८०० किलो गांजा (Hemp) पोलिसांनी हस्तगत केला आहे. मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही कारवाई केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांनी गांजाची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रोळी – ठाणे मार्गावर सापळा रचला होता. यावेळी आलेल्या एका आशयर टेम्पोला पोलिसांनी संशयावरुन थांबविले. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात तब्बल १ हजार ८०० किलो गांजा  (Hemp) आढळून आला आहे. त्याची बाजारपेठेतील किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

----------------------------

Must Read

-------------------------------

अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी ब्युरोने मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. अनेक चित्रपट कलावंत व त्यांना अंमली पदार्थ पुरविणार्‍यांची धरपकड केली. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानेही अनेक कारवाया केल्या आहेत. असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक केली जात होती.