molestation casecrime news- आजकाल महिलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या अशा अशा विचित्र घटना समोर येत आहेत की, विश्वास बसत नाही. या घटनांवरून हे दिसून येतं की, महिला बाहेरच काय घरातही सुरक्षित नाहीत. महिला घरातही सुरक्षित नाहीत याचं उदाहरण असंणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या(West Bangal) हुगली (Hugli District) जिल्ह्यातील प्रसिद्ध कंपनीच्या डिलेव्हरी बॉयने (Cake Delivery Boy) असं काही केलं की, वाचून हैराण व्हाल. आता या डिलेव्हरी बॉयला लोक सिरीअल बलात्कारी (molestation) म्हणत आहेत. त्याचा गुन्हा इतका गंभीर आहे की, महिला त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. 

इतकेच नाही तर आरोपीने महिलांसोबत ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराच्या घटना कशाप्रकारे केल्या हे जाणून घेऊन पोलिसही हैराण झाले आहेत. हा डिलेव्हरी बॉय प्रसिद्ध कंपनीच्या उत्पादनांबाबत फीडबॅक जाणून घेण्याच्या बहाण्याने महिलांना व्हिडीओ कॉल करत होता.

आरोपीने सांगितले की, फीडबॅकच्या नावावर व्हिडीओ कॉल (video call) करतेवेळी महिलांचे काही आक्षेपार्ह फोटो  आणि व्हिडीओ बनवल्यावर तो महिलांना ब्लॅकमे करत होता. ब्लॅकमेल केल्यानंतर तो त्या महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग (molestation) पाडत होता. 

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

पोलिसांनुसार, हुगलीच्या क्योटाच्या त्रिकोण पार्कमध्ये राहणारा तरूण विशाल शर्मावर ६६ महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा आरोप आहे.  चंदननगर कमिश्नरेटच्या अंतर्गत चुचुडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी विशाल शर्मा आणि त्याचा एक साथीदार सुमन मंडल यालाही अटक करून तुरूंगात टाकलं आहे. 

इतकेच नाही तर या प्रकरणातील आरोपी विशाल शर्माच्या आईनेही आपल्या मुलाचा गुन्हा मान्य केला आहे. सोबतच या कृत्यात सहभागी असल्याचा आरोपही मान्य केला आहे. आता विशाल शर्मावर वेगवेगळ्या केसेस लावण्यात आल्या आहेत.