recruitment newsrecruitment news- 10 पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नेहरू युवा केंद्रामध्ये नॅशनल यूथ व्हॉलेंटिअर पदासाठी तब्बल 13206 जागांसाठी भरती केली जाणार आहे. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संघटनाने ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे.

नेहरु युवा केंद्र ही संघटना क्रीडा मंत्रालयांच्या अखत्यारित येते. यासाठी 5 फेब्रुवारीपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. केवळ एक मुलाखत देऊन तुम्हाला नेहरु युवा केंद्र संघटनेमध्ये (NYKS) स्वयंसेवक बनता येणार आहे. याकरिता तुम्हाला भारत सरकारकडून दर महिन्याला पगारही दिला जाणार आहे. या पदासाठी उमेदवार 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

तसेच उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2021 पर्यंत वय 18 ते जास्तीत जास्त 29 वर्षे असायला हवे. नॅशनल यूथ व्हॉलेंटिअरच्या भरतीसाठी तुम्हाला नेहरू युवा केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. nyks.nic.in वर ऑनलाईन अर्ज करावा लागणार (recruitment news)आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला उद्याचाच दिवस उरला आहे. यासाठी कोणतेही अर्जशुल्क राहणार नाही.