finance ministernational news-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (finance minister) यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्यांनावर कराचा बोजा पडू न देता समतोल अर्थसंकल्प (Budget) सादर केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे तर विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावरुन सरकारवर टीका केली आहे. 

खास करुन खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या सरकारच्या निर्णयावरुन विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. असं असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या खास शैलीमध्ये अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. हा देशाचा अर्थसंकल्प आहे की ओएलएक्सवरची जाहिरात असा टोला जगताप यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण, पॉवर ग्रीड, रेल्वे, विमानतळ, शीतकोठारे, क्रीडांगणे आदी सरकारी अखत्यारीतील कंपन्या व आस्थापनांच्या मालमत्तांच्या व कामांच्या व्यवस्थापनांची जबाबदारी खासगी क्षेत्राकडे देण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी दिली. सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला गती देऊन १.७५ लाख कोटींचा निधी उभारला जाईल, असंही निर्मला सीतारामन (finance minister) यांनी स्पष्ट केलं आहे. 

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------


गेल्या वर्षी २.१ लाख कोटींचे लक्ष ठेवले गेले होते, पण बीपीसीएल व एलआयसीच्या निर्गुतवणुकीचा प्रयत्न अपयशी ठरल्याने हे लक्ष साध्य करता आलं नाही. या वर्षी ‘एलआयसी’च्या आरंभिक खुल्या विक्रीचा प्रस्ताव (आयपीओ) आणला जाणार असून त्याद्वारे भांडवल उभारणी केली जाईल तसेच सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका व सरकारी विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाईल अशी घोषणाही निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये केली आहे.

या खासगीकरणाच्या मुद्दयावरुनच भाई जगताप यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. “हा देशाचा अर्थसंकल्प आहे की ओएलएक्सवरची जाहिरात? यांना शक्य झालं तर संसदही विकतील,” असं ट्विट जगताप यांनी केलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पातील (Budget) खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन सोमवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एक विमा कंपनी यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या भागभांडवलाची विक्री करून सरकारने भारताची मालमत्ता भांडवलदार मित्रांच्या हाती सुपूर्द करण्याची योजना आखली आहे, असा टोला राहुल यांनी लगावला.

शेती क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर उपकर घेतला जाणार असल्याच्या निर्णय़ावरुनही जगताप यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “६५ वर्षात ६५ रुपयांना मिळणारे पेट्रोल ६५ महिन्यांत शंभरी जवळ गेलंय,” असं ट्विटही जगताप यांनी केलं आहे.