brother-do-you-mean-enemy



(Crime News) -भाऊ म्हणायचा की वैरी ; सख्ख्या भावाच्या डोक्‍यात त्याने घातली पहार. लांजा (रत्नागिरी) शेजाऱ्याची आणलेली कुऱ्हाड परत कर, असे सांगणाऱ्या सख्ख्या भावाच्या डोक्‍यात भावानेच पहार घातली. ही घटना बुधवारी (ता. १०) सकाळी तालुक्‍यातील वेरवली बुद्रुक येथे घडली. याबाबत लांजा पोलिसांनी गुन्हा (Complant) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील वेरवली बुद्रुक येथील सचिन शंकर अडबल (३२ वर्षे) याचा सख्खा भाऊ रूपेश शंकर अडबल यांनी त्यांच्या शेजारी राहणारे राजाराम गंगाराम अडबल यांच्या मालकीची कुऱ्हाड व कोयती त्यांना न सांगता आणली होती. याची माहिती राजाराम अडबल यांना मिळतात त्यांनी रूपेश अडबल यांना कुऱ्हाड व कोयती परत आणून (Bringing back)  द्या, असे सांगितले होते; मात्र रूपेश अडबल यांनी राजाराम अडबल यांची कुऱ्हाड व कोयती परत दिली नाही. 

----------------------------

Must Read

------------------------------

त्यामुळे राजाराम अडबल यांनी रूपेश अडबल यांचा भाऊ सचिन अडबल यांना तुझ्या भावाने नेलेली कुऱ्हाड व कोयती आणून दे, असे सांगितले.राजाराम अडबल यांनी सांगितल्याप्रमाणे सचिन अडबल यांनी आपला भाऊ रूपेश अडबल यांना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास राजाराम अडबल यांची आणलेली कुऱ्हाड व कोयती परत कर, असे सांगितले. 

याचा रूपेश अडबल यांना राग आला आणि त्यांनी भाऊ सचिन यांना मारहाण केली. या वेळी शेजारी असलेली लोखंडी पहार उचलून रूपेश अडबल यांनी सचिन अडबल यांच्या डोक्‍यात डाव्या बाजूला मारली. यामध्ये सचिन अडबल यांच्या डोक्‍याला दुखापत झाली. जखमी अवस्थेतच सचिन अडबल यांनी लांजा पोलिसांत रूपेश यांच्याविरुद्ध (Complant)  फिर्याद दिली.