suicide case


ऑनलाइन टिम:

crime news- एकुलत्या एक मुलीच्या विवाहाची जय्यत तयारी सुरु होती. खरेदीही झाली होती. हळदीचा मांडव उभारण्यासाठी काही तासच शिल्लक असतानाच नववधुने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले आहे. हि घटना व्यंकटेशनगर भागात घडली असून दुर्गा संजय काचवार (वय २०) मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे, शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, व्यंकटेशनगर भागातील किरकोळ किराणा व्यवसायिक संजय गणेशराव काचवार यांच्या दुर्गा या एकुलती एक मुलीचा नांदेड येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाशी विवाह ठरला होता. हा विवाह येत्या १४ फेब्रुवाराला म्हणजे व्हॅलेंनटाइन डे (valentine day) च्या दिवशी होणार असल्याने दोन्हीकडील मंडळींची लग्न खरेदीची धामधूम सुरू होती. गुरुवारी दिवसभर स्वत: वधु, तिचे आई-वडील, चुलते-चुलती आणि परिवारातील इतर सदस्यांनी शहरातून खरेदी केली होती. तर वडिलांनी गुरुवारी अमावस्या असल्याकारणाने एक दिवस हाळदीचा मंडप टाकायचा हे ठरवले होते. 

------------------------------

Must Read

त्याप्रमाणे मंडपासाठी लागणारे सर्व साहीत्य आणून ठेवले होते. तसेच उर्वरित खरेदीसाठी इतर मंडळी घराबाहेर पडली होती. घरात दुर्गा व तिचे वडीलच थांबले होते. दरम्यान वडिलांनी चहा करण्यासाठी आपल्या मुलीला आवाज दिला. आवाज दिल्यानंतर तिने प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी वरच्या मजल्यावर जावून डोकावले असता दुर्गा हिने गळफास (suicide) घेतल्याचे समोर आले. या घटनेमुळे काचवार कुटूंबीय हादरून गेले आहे. शिक्षित तरुणीने हाळद लागण्यापूर्वीच असे कृत्य केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.