sports certificate


soprts new-बहुचर्चित बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकऱ्या लाटण्याचे प्रकार उघड होण्याचे प्रमाण हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतचं चालले आहेत. नाशिक, संभाजीनगर आणि नगर जिल्ह्यातील कारवाईनंतर आता पुण्यातही बोगस क्रीडा(certificate) प्रमाणपत्र प्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सेपाक टकरॉव या खेळातील एका स्वयंघोषित पदाधिकाऱ्याला अटक केली आहे.

 बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या या गोरख धंद्यात अनेक मोठी नावेही पुढे येण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात खळबळ निर्माण झाली असून, अजून बोगस खेळाडू व काही संघटनेवरही कारवाईचे संकेत शासनाने दिले आहेत. शासनाच्या क्रीडा व युवक संचनालयाने खेळाडू बोगस प्रमाणपत्राबाबत पुण्यातील हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये दोन महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली होती.


 क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी शासनाच्यावतीने फिर्याद दाखल केली होती. अखेर हिंजवडी पोलिसांनी तपास करीत 4 फेब्रुवारीला नाशिकमधून एका स्वयंघोषित पदाधिकार्‍यास अटक करून फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलिसांनी महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉव संघटनेचे डॉ. सुखदेव विश्वास, कृणाल आहिरे ,बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरीचा लाभ घेणारे बोगस खेळाडूंविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 2016 ते 2019 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय सेपाक टकरॉव स्पर्धेत 5 खेळाडू राज्याचे प्रतिनिधित्व करायचे. 

मात्र, स्पर्धेत सहभागी नसलेल्या 6-7 खेळाडुंना बोगस प्रमाणपत्रे दिली जात होती. या(certificate) प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणात संबंधित खेळाडूंनी सरकारी नोकऱ्याही लाटल्या आहेत. याबाबत नाशिकमधील अन्याय झालेल्या खेळाडूंनी वर्षभरापूर्वी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. बकोरिया यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातल्याने अखेर या तक्रारीची दखल हिंजवडी पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल केला आहे. 

 हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाव्दारे सहाय्यक पोलिस निरिक्षक खाडे या गुन्हाचा तपास करीत आहे. संघटनेच्या पदाधिकार्‍यांना अटक करून खेळाडूंची नावे निश्चित झाल्यानंतर खेळाडूंवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल असे खाडे यांनी सांगितले आहे.