ऑनलाइन टिम:
दिल्लीमध्ये २५ वर्षीय तरुणची त्याच्याच शेजारी राहणाऱ्यांकडून निर्घृण हत्या (murder) करण्यात आली आहे. मंगलपुरी परिसरात ही घटना घडली आहे. पीडित रिंकू शर्मा हा भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. हल्ल्यात जखमी झालेल्या रिंकू शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपी नसरुद्दीन, इस्लाम, झाहीद आणि मेहताब यांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी (murder investigation) दिली आहे.
दरम्यान कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, “रिंकू आणि शेजारी राहणाऱ्या नसरुद्दीन यांच्यात काही धार्मिक वक्तव्यावरुन वाद काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी रात्री नसरुद्दीन आणि इतर तिघे जबरदस्ती घरात घुसले आणि रिंकूच्या पाठीवर चाकूने वार केला”. पोलिसांनी व्यवसायिक वादातून हत्या झाल्याची माहिती दिली असताना विश्व हिंदू परिषद मात्र राम मंदिरासाठी निधी जमा करण्यावरुन हत्या झाल्याचा दावा करत आहे.
------------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष शुक्रवार,12 फेब्रुवारी २०२१
2)इचलकरंजीत आढळला कोरोनाचा रूग्ण..?
3) जिल्ह्यात नव्याने १६ रूग्ण पॉझिटिव्ह..!!
-------------------------------
“आतापर्यंत तपासात मिळालेल्या (murder investigation) माहितीनुसार, वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान रेस्तराँ बंद करण्यावरुन हा वाद झाला होता. सर्वजण एकमेकांना ओळखत होते आणि एकाच परिसरात राहत होते. हत्येमागे इतर कोणतं कारण असल्याचा दावा चुकीचा आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.
रिंकूचा भाऊ मनू शर्मा याने मात्र आपल्या मालकीचं कोणतंही रेस्तराँ नसल्याची माहिती दिली आहे. “माझा भाऊ वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. घऱी येत असताना त्याचा पाठलाग करण्यात आला आणि घराबाहेर नेऊन हत्या करण्यात आली. आमचं कोणतंही फूड शॉप नाही. ५ ऑगस्टला राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी गेलो होतो तेव्हाही ते आमच्यासोबत भांडले होते,” असा दावा मनू शर्माने केला आहे.
रिंकूच्या आईने बोलताना आपण त्याला वाचवू शकलो नाही अशी खंत व्यक्त करताना घऱाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती असं म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच मंगलपुरी पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता.