शिवेंद्रराजे भोसले



politics news- साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली आहे. “माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान (Threat) दिलं आहे. साताऱ्यातील जावळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवेंद्रराजेंनी नेमकं काय म्हटलं आहे

“माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा (Threat) हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून (assembly election) आलेला माणूस आहे.”

--------------------------------
Must Read


1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेलं हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.