ajit pawar on politics


ऑनलाइन टिम:

politics news - राज्यात राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा वाद वाढताना दिसत आहे. तर राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान (airplane) परवानगी नाकारल्याने आता महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात राजकारण (politics) तापल्याचं दिसत आहे. तसेच भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवार यांचा स्नेह केवळ सत्तेशी आहे, असं दरेकर यांनी पंढरपूर येथे म्हटलं आहे. प्रवीण दरेकर हे शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर असून, तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, राज्यपालांना विमानातून (airplane) उतरवणे हा पोरखेळ असून, हा घटनात्मक पदाचा अवमान आहे. कायदा सर्वांना सारखा आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी कागदपत्रे गेली होती. मात्र, त्यांनी बाजूला ठेवली, असा दावा दरेकर यांनी केला आहे. तसेच कोणत्याही पक्षाचा नेता असो, चुकीची भाषा वापरली जाता कामा नये. कार्तकर्त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. खालच्या स्तरावर टीका होऊनही आम्ही कुणाला मारहाण केली नाही. यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तर फडणवीस दाम्पत्यावर अश्लील भाषेत टीका केली जातेय, त्याचे काय?, असा ठोक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

-----------------------------

Must Read

दरम्यान, पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेकविध प्रश्नांवर भाष्य करत उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचे उमदेवार निवडून यावेत म्हणून निर्णय बदलले आहेत. राज्यातील सरपंचच्या आरक्षणाची सोडत चुकीची आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.