crime news- मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अशी एक कारवाई केली आहे त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तुम्ही पंतप्रधान कार्यालया मार्फत कोणत्या योजनांचा विशेष करुन लोन योजनेचा फायदा घेणार असाल किंवा नुकताच अर्ज केला असेल आणि त्याकरता तुम्ही काही पैसे भरले असतील तर तुमची फसवणूक होण्याची शक्यात आहे. कारण पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विशेष कर्ज योजनांच्या नावाने बनावट अॅप्लिकेशन (fraud application) तयार करून देशातील शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी त्यासाठी पंतप्रधानांचे छायाचित्र व राजमुद्रा यांचा गैरवापर केला केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी नागरिकांना जाळय़ात ओढण्यासाठी पेपरात जाहिराती देखील दिल्या होत्या.
----------------------------------
Must Read
1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम
3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले
------------------------------------
तरुणाचा नंबर व्हायरल केला आणि...
शिवाय आरोपींनी PMYL योजनेचे सर्व फोटो वापरुन एका अॅप्लिकेशनवर संपर्क क्रमांक म्हणून कुर्ल्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मोबाईल नंबरचा वापर करण्यात केला होता. हा तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याला या अॅप्लिकेशन (fraud application) संदर्भात अनेक व्यक्तींचे धमकीचे फोन येऊ लागले. यासाठी भरलेली रक्कम परत मागण्यासाठी आलेल्या फोनमुळे त्या तरुणाला काय करावे ते कळत नव्हते. शेवटी त्याने कंटाळून मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी त्या तरुणांच्या तक्रारीवरुन तपास केला असता पोलिसांना ही धक्कादायक माहिती समोर आली.
या टोळक्याने प्रधानमंत्री योजना लोन, पीएम लोन योजना,'पीएमवायएल लोन, सर्वोत्तम फायनान्स लोन सर्व्हिस अशा विविध नावाने मोबाईल अॅप तयार केले होते. ज्यात त्यांनी शासकीय मुद्रेचा आणि पंतप्रधानांच्या फोटोचा वापर केला होता. एका व्यक्तीकडून किमान 900 ते 3 हजार रुपये घेवून या टोळक्याने 4 हजार जणांची फसवणूक केली.
या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 4 जणांना अटक केली आहे. ज्यात उत्तर प्रदेशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचा मोठा पदाधिकारी तथा आमदारकीची निवडणूक लढलेला व्यक्ती देखील आहे. संजीव कुमार सिंह वय 36 वर्षे, प्रांजूल राठोड वय 27 वर्षे, रामनिवास कुमावत, शिक्षण बी टेक ( आय टी ) वय 25 वर्षे आणि विवेक शर्मा वय 42 वर्ष शिक्षण MSc IT अशी आरोपींची नावे असून त्यांना भादंवी कलम 419, 420,465, 468, 170, 34 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधककायदा कलम 66(क) व 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करुन या चौघांना अटक करण्यात आली आहे.