banana peelskin care tips- केळ्याच्या सेवनामुळे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण केळ्याची सालीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा असतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्यापैकी बहुतांश जण डझनभर केळी घरी आणतात, ती खातात आणि निरुपयोगी समजून साली (banana peel) कचऱ्याच्या डब्यात फेकतात. पण तुम्ही मोठी चूक करताय, हे लक्षात घ्या.केळ्याच्या सालीचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास तुमच्या त्वचा-केस आणि दातांच्या आरोग्यास भरपूर लाभ मिळतील.

​त्वचा तरुण आणि डागविरहित राहण्यासाठी

केळ्याची साल त्वचेवर रगडल्यास त्वचेवरील चमक वाढते आणि सुरकुत्या देखील कमी होतात. सोबतच चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांची समस्याही हळूहळू दूर होण्यास मदत मिलते.

केळ्याची साल चेहऱ्यावर रगडल्यास किंवा चेहऱ्यावर लावून ठेवल्यास आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.

झोपेतून सकाळी उठल्यानंतर काही जणांचे डोळे सुजलेले असतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपण केळ्याच्या सालीचा उपयोग करू शकता. काही मिनिटांसाठी केळ्याची साल केवळ आपल्या डोळ्यांवर ठेवा.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

केळ्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत, हे घटक आपल्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक असतात. केळ्याच्या सालीपासून हेअर मास्क तयार करून वापरल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यासह केसांचा पोत देखील सुधारण्यास मदत मिळते. शिवाय केसांवर नैसर्गिक चमक देखील येते.

 • केळ्याच्या सालीपासून हेअर मास्क तयार करण्याची पद्धत
 • केळ्याची साल मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा आणि पेस्ट तयार करा
 • तुमचे केस तेलकट असल्यास यामध्ये कोरफड मिक्स करा
 • केस कोरडे असल्यास त्यामध्ये एक चमचा नारळाचे तेल मिक्स करावे
 • केसगळतीची समस्या रोखण्यासाठी यामध्ये पपईचे एक स्लाइस मिक्स करू शकता
 • पेस्ट तयार झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी केसांमध्ये लावा आणि त्यानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या

​दात पांढरेशुभ्र होण्यासाठी

२०१५ मध्ये करण्यात आलेल्या संशोधनामधील (Detection of antimicrobial activity of banana peel) दाव्यानुसार, केळ्याच्या सालीमध्ये आढळणारे गुणधर्म बॅक्टेरियांविरोधात लढण्याचे कार्य करतात. यामुळे दात व हिरड्यांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.

​या गोष्टी देखील ठेवा लक्षात

 • नेहमीच ताज्या केळ्यांच्या सालीचाच (banana peel) उपयोग करावा
 • केळ्यांच्या साली साठवून ठेवू नये
 • काही लोकांना केळ्याची अ‍ॅलर्जी असते, अशा लोकांनी केळ्याचा किंवा केळ्याच्या सालीचा उपयोग करू नये
 • केळ्याच्या सालीपासून तयार केलेल्या पेस्टचा लगेचचा उपयोग करावा. दुसऱ्या ही पेस्ट वापरू नये
 • केळ्याच्या सालीचा त्वचेवर उपयोग केल्यानंतर कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी झाल्यास हा उपाय करणं टाळावे.