fraud job news


करोना संकटकाळात झालेल्या टाळेबंदीमुळे अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली. बेरोजगार तरुण-तरुणी इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी शोधत (job  portal) असताना सायबर भामटे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नोकरी शोधणाऱ्यांची फसवणूक करीत आहेत. कोका कोलासारख्या अनेक नामांकित कंपन्यांची बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवणुकीचे (fraud) प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नोकरी शोधताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

कोका कोला कंपनीत नोकरीची संधी असून ऑनलाइन मुलाखती सुरू असल्याच्या जाहिराती इंटरनेट (job  portal) तसेच इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जाहिरातींमधील क्रमांकावर संपर्क साधल्यावर ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन मुलाखत तसेच वेगवेगळ्या प्रकारची फी मागून लाखो रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे येत आहे. काही तक्रारींची शहानिशा केल्यावर, ताबडतोब तक्रार करण्यासाठी आलेल्यांचे पैसे बँकेमार्फत वाचविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. अशाच प्रकारच्या तक्रारी विविध पोलिस ठाण्यांकडे येत असल्याने सायबर पोलिसांनी बेरोजगार तरुणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

अशी घ्या काळजी

- नोकरीच्या जाहिरातीमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

- मोठ्या कंपन्या शक्यतो ऑनलाइन मुलाखती घेत नाहीत हे ध्यानात असू द्या.

- लिंकवर जाऊन वैयक्तिक माहिती किंवा बँक खात्याचा तपशील भरू नका.

- ऑनलाइन मुलाखत, नोंदणी, पासपोर्ट, व्हिसासाठी आर्थिक व्यवहार करू नये.

- जाहिरात दिसल्यास शक्यतो प्रत्यक्षात जाऊन शहानिशा करावी.

- परदेशात नोकरीच्या संधीला लगेच भुलून जाऊ नका.

- काही देण्याआधी अशा प्रकारची फसवणूक झाली आहे का ते तपासा.

- फसवणूक झाल्यास बँक आणि जवळच्या पोलिस ठाण्यात जा

- cybercrime.gov.in येथेही तक्रार करता येते.