moneyऑनलाइन टिम:

business ideas- कोरोना काळात अनेकांची नोकरी गेल्यानं ते व्यवसायाकडे वळाले आहेत. काहींना अतिरीक्त नफा हवा असल्यानंही ते व्यवसाय करतात. कमीत कमी गुंतवणुकीत जास्त नफा (profit) करून देणाऱ्या व्यवसायाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. अनेक मोठ्या कंपन्या केळीचे चिप्स बनवत नाहीत. याच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला लाखोंची कमाई करू शकता. केळीच्या चिप्सला मार्केट लहान असल्यानं तुम्ही स्वत:चा ब्रँड तयार करू शकता. याला खूप मागणीही आहे.

केळीचे चिप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य

यासाठी कच्ची केळी, तेल, मीठ, मसाले आणि काही मशीन लागणार आहेत. केळीचं साल काढणारी मशीन, केळीचे काप कापणारी मशीन, तळणारी मशीन आणि मसाले एकत्र करणारी आणि पॅकिंग करणारी मशीन यांची गरज आहे.

कुठं मिळतील मशीन ?

या मशीनची किंमत ही 28 हजार रुपयांपासून तर 50 हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी तुम्हाला 4-5 गुंठ्याची जागा लागणार आहे. https://india.alibaba.com/index.html या वेबसाईटवरूनही तुम्ही मशीनची ऑनलाईन खरेदी करू शकता.

----------------------------

Must Read

-------------------------------

50 किलो चिन्स बनवण्यासाठी किती खर्च येतो ?

50 किलो चिप्स तयार करण्यासाठी 120 किलो कच्ची केळी आवश्यक आहेत. यासाठी 1000 रुपये खर्च होईल. याचसोबत 12 ते 15 लिटर तेलासाठी 1050 रुपये खर्च करावे लागतील. मशीनसाठी सरासरी 10 ते 11 लिटर डिझेल लागेल. याला 900 रुपये खर्च होतील. मीठ-मसाले यासाठी 150 रुपये लागतील. हा सर्व खर्च मिळून 3200 रुपये आहे. यात 1 किलो चिप्स हे 70 रुपयात तयार होणार आहेत. बाजारात  (business ideas) 90 ते 100 रुपये प्रतिकिलो विक्री करून तुम्ही यातून नफा कमावू शकता.

होणार 1 लाखाची कमाई

जर आपण 1 किलो चिप्सच्या विक्रीवर किमान 10 रुपये नफा गृहित धरला तर तुम्ही दिवसाला साधारण 4 हजार रुपयांची कमाई करू शकता. महिन्याला 25 दिवस जरी तुमचा व्यवसाय सुरू राहिला तरी महिन्याला 1 लाखांची कमाई तुम्ही करू शकता.