ऑनलाइन टिम:
Crime News- एटीएम कार्डचं क्लोनिंग करून त्याद्वारे पैसे काढण्याच्या ट्रीकपासून लोक जागरूक होत नाही, तोपर्यंत फ्रॉडस्टर्सची आता नवीन फसवणुकीचा (Fraudulent) प्रकार शोधून काढला आहे. नोएडा पोलिसांच्या हाती हा फसवणुकीचा, एटीएम (ATM) क्लोनिंग (Cloning) चा नवीन प्रकार हाती लागल्यानंतर तेदेखील हैराण आहेत.एटीएम कार्ड क्लोनिंग करण्यासाठी, एटीएमच्या आत क्लोनिंग मशीन फिट केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या वाढत्या प्रकारानंतर लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाल्यानंतर आता याहून पुढे एक प्रकार समोर आला आहे.
नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रॉड करणारे (Cloning) एटीएममध्ये कार्ड स्वाईपच्या जागी एका स्किमर डिव्हाईसचा (skimmer device) वापर करत आहेत. ज्यावेळी व्यक्ती पैसे काढण्यासाठी आपलं डेबिट कार्ड स्वाईप करतो, त्यावेळी त्याचा संपूर्ण डेटा म्हणजे कार्डच्या मागची काळ्या रंगाची स्ट्रिप, सीवीवी नंबरही स्कॅन होतो. हा प्रकारही जुन्या फसवणुकीसारखाच आहे. जिथे पासवर्ड (Password) पाहण्यासाठी कोणी ना कोणी आत येत असे, आता त्याऐवजी एटीएमच्या किपॅडजवळ एक छोटा कॅमेरा लावतात, ज्यामुळे पासवर्ड सहजपणे समजतो.
---------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष रविवार,14 फेब्रुवारी २०२१..!!
2)इचलकरंजी युवकावर खूनी हल्ला...!!
3)कोल्हापुरात 100 एकरमध्ये आयटी पार्क उभारणार : उद्योगमंत्री..?
बँकिंग सेक्टरशी संबंधित अनुराग यांनी सांगितलं की, एटीएममध्ये पैसे काढताना केलेली घाईगडबड भारी पडू शकते. ज्यावेळी पंप पॅनेल अर्थात जिथे कार्ड स्वॅप (Card swap) केलं जात, तिथे लक्षपूर्वक ती जागा हलवून पाहा. कार्ड स्वाईप करण्याच्या जागेवर वेगळं काही लावलं नाही ना ते यामुळे समजेल. तसंच हिडन कॅमेरा पासवर्ड (Password) समजण्यासाठीच लावलेला असतो. त्यामुळे तो किपॅडजवळच लावला असण्याची शक्यता असते. त्यामुळे तेथेही चेक करू शकता. त्याजागी एखाद्या काळ्या होलसारखं दिसल्यास वेळीच सावध व्हा. अशाप्रकारे काही संशयास्पद आढल्यास त्वरित पोलिसांना याची माहिती द्या.