ashwin cricketerऑनलाइन टिम :

sports news- फिरकीला मदत करणाऱ्या आन्हानात्मक खेळपट्टीवर अष्टपैली रविचंद्रन अश्विन यानं संयमी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. अश्विन याच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाज  (cricketer) दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अडखळत होते. 

मात्र, आर. अश्विन यानं संयमी फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आर. अश्विनचं कार्किर्दीतील आपलं पाचवं शतक झळकावलं आहे. याआधी वेस्ट इंडिजविरोधात शतकी खेळी केली होती. पहिल्या डावात रोहित शर्मानं शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात अश्विन यानं शतकी तडाखा लगवला.

---------------------------

गोलंदाजी करताना अश्विन (cricketer) यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं होतं. अश्विन यानं गोलंदाजी करताना पाच बळी घेतले होते. तर आता दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शतकी खेळी केली. अश्विन यानं १३५ चेंडूचा सामना करताना शतकी खेळी केली. या शतकी खेळीदरम्यान अश्विन यानं १४ चौकार आणि एक षटकार लगावला.

अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली आहे. अश्विन यानं सुरुवातीला कर्णधार विराट कोहलीच्या मदतीनं संघाचा डाव सावरला. कोहली बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढवली. तचेस आपलं वैयक्तीक शतकही पूर्ण केलं. अश्विन याचं हे पाचव शतक आहे. याआधी वेस्ट इंडिजविरोधात अश्विन यानं चार शतकं झळकावली होती.