ankita lokhande


छोट्या पडद्यावरुन अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱी अभिनेत्री अकिंता लोखंडे बॉलिवूडमध्ये देखील नशीब आजमावतेय. ‘मणिकर्णिका द क्विन ऑफ झासी’ आणि ‘बागी-3’ या सिनेमांमधून अंकिताने महत्वाच्या भूमिका साकरल्या आहेत. सोशल मीडियावरदेखील (viral on social media) अंकिता चांगलीच चर्चेत असते.

अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. डान्स करतानाचा अंकिताचा हा व्हिडीओ तिच्या फॅन्सच्या पसंसीत उतरलाय. मात्र या व्हिडीओवरुन सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलंय.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------


अंकिता लोखंडे सध्या बॉयफ्रेण्ड विकी जैनसोबत वेळ घालवताना दिसतेय. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअऱ करत असते. यातच अंकिताने डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केलाय. काळ्या रंगाच्या पोलकाडॉट स्कर्ट आणि टॉपमध्ये अंकिता बिनधआस्त डान्स करतेय.  एका इंग्लिश गाण्यावर अंकिता डान्स करत असून तिच्या या डान्सिंग अंदाजाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिलीय..”ज्या व्यक्ती डान्स करतात त्या स्वाभिमानी असून आयुष्याकडे त्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात” अशं कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला (viral on social media) दिलंय.

मात्र सुशांत सिंह राजपूतच्या काही चाहत्यांनी अंकिताला ट्रोल केलंय. ‘मिस यू सुशांत’ अशा कमेंट अंकिताच्या या व्हिडीओला काहींनी दिल्या आहेत. तर ‘वेडी झालीय का? असं म्हणत काहींनी अंकिताला ट्रोल केलंय. काहींनी अंकिताला ही डान्स स्टाईल शोभत नसल्याचं म्हंटलं. डान्सचे व्हिडिओ पोस्ट करण्याची अंकिताची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील अंकिताने डान्स करतानाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.