Akash Thokar web series


ऑनलाइन टिम :

entertainment center- 26 फेब्रुवारीला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणारी ‘1962 – द वॉर इन द हिल्स’ (1962 The War In The Hills) वेब सीरिजमध्ये सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thokar) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. वेब सीरिजमधील आकाश ठोसरचा लूक समोर आला होता. त्याचा हा जबरदस्त लूक पाहूण चाहते चकित झाले होते. नुकताच आकाश ठोकरने या वेब सीरिजचे (web series) टीझर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ही बेव सीरिज आहे, अभय देओल आणि सुमित व्यास या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसतील आहेत. भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या वेब सीरिजची कथा आहे. या वेब सीरिजमध्ये आकाश ठोकर किशन नावाचे पात्र साकारणार आहे. मेजर सूरज सिंहच्या बटालियनमध्ये किशन आहे.

----------------------------एका मुलाखती वेळी आकाश ठोकरने सांगितले होते की, 1962 चा वॉर इन हिल्स ही वेब सीरिज (web series) माझ्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे कारण मी लहानपणापासून भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी मी दोनदा प्रयत्नही केला होता. मी जर चित्रपटांमध्ये प्रवेश केला नसता तर निश्चितपणे मी आता भारतीय सैन्यात असतो.

आकाश पुढे म्हणाला होता की, लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. जेव्हा ही व्यक्तिरेखा मला मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. वास्तविक जीवनात खरे नाही, परंतु पडद्यावर ती वर्दी घालण्याची संधी मिळाली. आकाशने करिअरची सुरुवात सैराट या सुपरहिट चित्रपटाद्वारे केली आहे.