ajit pawar




 सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या (price hike) दरवाढीवरुन विरोधक केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यात राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

 अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. पेट्रोल-डिझेलची(price hike)  दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल 100 रुपये लिटर झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नये. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. वीज दरवाढीबाबत भाजपच्या उद्या होणाऱ्या आंदोलनाबाबत अजित पवार म्हणाले की, वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांची 45 हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ 15 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत.

 असे 30 हजार कोटी रुपये माफ केले आहेत. वीज कंपन्या अडचणीत असतानाही 30 हजार कोटी रुपये माफ करून अडचणीत असलेल्या माणसाला राज्य सरकारने आधार दिलाय. त्यामुळे तोंडदाखल भाजप उद्या आंदोलन करतंय, असं पवार म्हणाले सेलिब्रेटींनी काय ट्विट करावं हा त्यांचा अधिकार सेलिब्रेटींनी काय ट्विट करावं हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याला घटनेनं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्याबद्दल आम्हाला टिपण्णी करण्याचं गरज नाही. उलट एवढं आंदोलन पेटललं असतानाही केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही, असं अजित पवार म्हणाले.

 काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्तावावर अजित पवार म्हणतात... काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्तावावर अजित पवार म्हणाले की, अशा बातम्यात काहीही तथ्य नसतं. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत. त्या संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतोय. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्यांनी चर्चा करण्याचं कारण नाही, असं पवार म्हणाले.