aishwarya and abhishekऑनलाइन टिम :

entertainment center- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन त्यांची मुलगी आराध्याची नेहमीच सर्व बाबतीत खूप काळजी घेताना दिसतात. जेव्हा ते दोघंही ऐश्वर्याला घेऊन जातात त्यावेळी तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची नेहमीच काळजी घेतात आणि हे साहाजिक आहे कारण कोणत्याही आई-वडीलांना आपल्या मुलांची काळजी वाटतेच. पण काही युझर्सना मात्र ऐश्वर्याचं मुलीची एवढी काळजी करणं आवडत नाही. त्यामुळे तिला नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल (social media) केलं जातं. आताही ऐश्वया आराध्यासोबत एअरपोर्टवर दिसली त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ऐश्वर्याला पुन्हा ट्रोल (troll) केलं जात आहे.

ऐश्वर्या आणि आराध्याचे एअरपोर्टवरील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या आराध्याचा हात पकडून चालताना दिसत आहे. तर अभिषेक बच्चन या दोघींच्या मागून चालत आहे. हे फोटो पाहिल्यावर युझर्सनी त्यावर कमेंट केल्या आहे. अखेर कधीपर्यंत ऐश्वर्या अशाप्रकारे आराध्याचा हात धरून चालणार आहे? असा प्रश्न एका युझरनं केला आहे. तर आणखी एका युझरनं लिहिलं, आता ऐश्वर्यानं अशा प्रकारे तिची अती काळजी करणं थांबवायला हवं.

----------------------------

काही दिवसांपूर्वी आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला होता. ज्यात ती भजन गाताना दिसली होती. आराध्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांनी आराध्यासोबतच ऐश्वर्या आणि अभिषेकचंही कौतुक केलं होत. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना युझर्सनी यातूनच ऐश्वर्या आणि अभिषेक मुलीला किती चांगले संस्कार देत आहेत हे दिसतं असं लिहिलं होतं.

तसं पाहायला गेलं तर आराध्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ऐश्वर्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा ती यावरून ट्रोल (troll) झाली आहे. जेव्हा एका युझरनं अभिषेकला आराध्या शाळेत जात नाही का असा प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना अभिषेकनं लिहिलं होतं, जास्त करून शाळा या शनिवार-रविवार बंद असतात त्यामुळे आराध्या वीक डे ला शाळेत जाते.