airtel users data



एअरटेल युजर्सला (airtel) आता आणखी सावध राहण्याची गरज आहे. नुकताच एक रिपोर्ट आला असून यात एअरटेलच्या नंबर्सचा डेटा लीक झाला आहे. यात युजर्संचे नंबर, नाव, पत्ता, शहर, आधार कार्ड नंबर, महिला-पुरूष यासारख्या माहितीचा समावेश आहे. हॅकर्सने २.५ मिलियन म्हणजेच २५ लाख युजर्संचा डेटा आपल्याकडे ठेवला आहे. हॅकर्सच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे भारतातील सर्व एअरटेल युजर्सचा डेटा आहे. व त्याला विक्री करायचा आहे. जर असे झाले तर एअरटेल युजर्स (users data) साठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

डेटा डंप च्या डिटेल्सला व्हेरिफाय करण्यात आले आहे. ज्यात अनेक नंबर्स एअरटेल युजर्सचे आहेत. इंटरनेट सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी ही माहिती दिली आहे. हॅकर्सने एअरटेल सिक्योरिटी टीम सोबत चर्चा केली आहे. ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. हॅकर्सने त्यांच्याकडे ३५०० डॉलर्सच्या बिटकॉइन्सची मागणी केली आहे. जर त्यांची मागणी मान्य झाली नाही तर युजर्संचा डेटा डार्क वेबवर सेल करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी एक बेकायदेशीर वेबसाइट बनवली होती. या ठिकाणी युजर्संचा डेटा एक नमुना सुद्धा दाखवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, २५ लाख एअरटेल युजर्संचा नमुना जम्मू काश्मीर मधील एका भागातील आहे.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

आता ही वेबसाइट उपलब्ध नाही. राजशेखर राजहारिया यांनी सांगितले की, डेटा लिंक आता उपलब्ध नाही. आता दुसऱ्या लिंकवर उपलब्ध करण्यात आले आहे. हॅकरने डेटाला पब्लिक प्लॅटफॉर्मवर डंप केले होते. तसेच एअरटेल युजर्संचे नंबर सिस्टम आणि सर्वर  (users data) वरून लिक झाले नव्हते. या data ला कोणत्याही अन्य सोर्सवरून लीक झाल्याची शक्यता आहे. यात सरकारी एजन्सीचा समावेश असू शकतो. जी सुरक्षाच्या कारणामुळे हे टेलिकॉम डेटाला अॅक्सेस करू शकते.

एअरटेलने (airtel) आपल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, आपल्या युजर्संची गोपनियतासाठी सुरक्षा ठेवणे तसेच त्यासाठी विविध उपायांना लागू करण्यासाठी कंपनीसाठी गर्वाची बात आहे. याप्रकरणी आम्ही सांगू शकतो की, आमच्याकडून कोणत्याही डेटाचे उल्लंघन झाले नाही. वास्तविक या ग्रुपकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. जो डेटा लिक झाला आहे त्यातील एक मोठा भाग एअरटेलचा नाही. याप्रकरणी कंपनीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.