ऑनलाइन टिम :

पंचगंगा नदी प्रदूषणाला (pollution) कारणीभूत​ ठरल्या प्रकरणी इंचलकरंजी व यड्राव परिसरातील​ कापडावर प्रक्रिया करणाऱ्या​ प्रोसेस ना क्लोजर व कारणे दाखवा नोटीस घेऊन फार​मोठी कारवाई केल्याच्या आविर्भावात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. परंतु मुळातच कोणताही उद्योग धंदा बंद​करा अशी कोणतीच मागणी नाही. तर​नदी प्रदूषित​करणाऱ्या घटकातून इथून पुढे दूषित पाणी​ (Contaminated water) कोणत्याही परिस्थितीत​नदीला जाणार नाही यासाठी प्रभावी उपाय योजना​करून कायमस्वरूपी नदी​ ​ प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढणे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे परंतु मूळ उद्देशालाच बाजूला ठेवून केवळ नोटिसा​ देण्यातच धन्यता मानणे म्हणजेच जखम पायाला आणि मलम शेंडीला असा प्रकार सुरू आहे.

लॉकडाऊन नंतर आता कुठे उद्योग​पूर्वपदावर येत आहेत. परंतु काही बेजबाबदार उद्योगाकडून व प्रशासनाच्या​डोळेझाक पणामुळे दूषित पाणी थेट​पंचगंगा नदीला सोडून नदी प्रदूषण (pollution) केली जात आहे. यामुळे नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नदी प्रदूषणाला​जबाबदार घटकावर कारवाई करावी व पुन्हा​ प्रदूषित पाणी नदीत​मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी​व यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी करून आंदोलने करण्यात आली.

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

याबाबत प्रांताधिकारी तहसीलदार कार्यालयात बैठकाही झाल्या यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टी यांनी​आंदोलना मागील भूमिका स्पष्ट केली असतानाही​ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ​ वस्त्रोद्योगाला टार्गेट करत काही​ प्रोसेस धारकांना क्लोजर चे नोटिसा तर काही​ प्रोसेस धारकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात धन्यता मानली.​ नोटिसा देऊन उद्योगधंदे बंद (Businesses closed) करून काही प्रमाणात नदी​ प्रदूषणाला बाळा बसेलही परंतु पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था होणार आहे.

मुळातच कोणताही उद्योग धंदा बंद​ करा अशी​ आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणीच​ नाही. तर उलट नदी प्रदूषण ला जबाबदार असणारा उद्योगातून (Business) दूषित पाणी बाहेर पडणारच नाही याची दक्षता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेणे गरजेचे आहे. जर एखाद्या उद्योगाला सीईटी प्लान्ट उभारण्याची​आर्थिक कुवत नसेल त्यांनी सामूहिक तत्वावर सी इ टी पी प्लांट​ उभा करावा त्यासाठी शासनाने ही​ आर्थिक मदत (Financial aid) करावी त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा उद्योगाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून शासनाकडे पाठपुरावा करेल परंतु जबाबदार घटकांची पाहणी करून दूषित पाणी नदीला जाणारच नाही याची दक्षता घेतल्यास नदी प्रदूषण मुक्त होईल- सागर शंभू शेट्टी [अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा मोर्चा ]