Account hacked, fraud of Rs 29 lakh


ऑनलाइन टिम:


Crime News- कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजकाच्या कंपनीचे मेल (Mail) अकाऊंट हॅक करुन 29 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत बसाप्पा गुडस्कर (वय 59 रा. ध्यानचंद हॉकी स्टेडियम, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. यानुसार रिंकु कुमार, नेसर आलम यांच्यासह अन्य एक जण अशा तीघांवर गुन्हा (Complaint) दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, कोल्हापुरातील एका वाहन उद्योजकाचे (entrepreneur) शाहूपुरी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते आहे. 27 जानेवारी 2021 रोजी एका नंबरवरुन बँकेच्या कॅशियरना फोन आला. फोन करणाऱया व्यक्तीने आपल्या खात्यातून दोन खात्यावर 29 लाख 34 हजार रुपये वर्ग करण्याची विनंती केली. मात्र संबंधीत कॅशियरने यास नकार दिला. 

----------------------------

Must Read

------------------------------

त्या व्यक्तीने मेलवरुन (Mail)  पैसे वर्ग करण्याची विनंती पाठवत असल्याचे सांगितले.संबंधीत कंपनीच्या मेलवरुन मेल आल्यानंतर कॅशियरने 29 लाख 34 हजार रुपयांची रक्कम रिंकु कुमार, नेसर आलम यांच्या खात्यावर वर्ग केली. संबंधीत कंपनीच्या खात्यातून पैसे वर्ग झाल्याचा मॅसेज आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांच्या निदर्शनास ही बाब आली. 

त्यांनी याबाबत संबंधीत बँकेमध्ये चौकशी केली असता, आपल्या मेलवरुन रिक्वेस्ट आल्यानंतरच पैसे ट्रान्स्फर केल्याचे सांगण्यात आले. मात्र आपण अशा प्रकारे कोणताच मेल अथवा फोन केला नसल्याचे संबंधीत कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. यानंतर फसवणूक (Cheating) झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला. याची चौकशी करुन तीघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.