Weekly market cancellation

ऑनलाइन टिम:

सातारा शहरात मागील काही दिवसांत कोरोनाचा (Covid-19) उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासनाने सोमवारी 15 फेब्रुवारीचा आठवडा बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी प्रतिबंधात्मक उपाय काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्ह्यात रुग्णसंख्या (Number of patients) हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असताना माणमध्ये मात्र, रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या फक्त दहिवडीत 42 कोरोनाचे रुग्ण आहेत. 

या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. अचानक मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे (Covid-19) रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका व लग्नसराईसह विविध ठिकाणी कोरोनाबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे. याच कारणामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी कोरोना नियंत्रणात (Control) आणण्यासाठी सर्व शासकीय विभागांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. तालुक्‍यातील सर्व ग्राम समित्या पुन्हा सक्रिय कराव्यात. 

----------------------------

Must Read

------------------------------

पुन्हा एकदा दुकानदारांना नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगावे. जिल्ह्यातून व परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती घ्यावी. कोविड- 19 बाधित रुग्णांच्या घराचा परिसर मायक्रो कन्टेंटमेंट झोन तयार करणे व त्याची अंमलबजावणी ग्रामस्तरीय समिती व नगरपालिका (Municipality) , नगरपंचायत कार्यक्षेत्र मुख्याधिकाऱ्यांनी करावी, तसेच रुग्णांची वर्गवारी करून पुढील उपचाराची जबाबदारी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांची राहील. संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी मुख्याधिकारी, ग्रामस्तरीय समिती, पोलिस विभाग व आरोग्य विभाग यांनी एकत्रित कामकाज करायचे आहे.


कोरोनाचा प्रसाराचा धोका असलेल्या सर्व ग्रामीण व शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर आहे तेथे नाकावर व तोंडावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector) आदेशानुसार 500 रुपये दंड आकारणी करावी, तसेच दुकानांमध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवण्यास व 5 पेक्षा जास्त व्यक्तींना दुकानामध्ये घेण्यास मनाई करावी. ग्रामीण व शहरी भागात या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. सुरक्षित अंतर पाळावे. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

अशी आहे रुग्णांची स्थिती 

माण तालुक्‍यात सध्या 87 कोरोनाबाधित आहेत. दहिवडी 42, शेवरी 8, गोंदवले बुद्रुक 6, पळशी 5 व इतर काही गावांमध्ये 1 ते 2 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. आजअखेर माणमध्ये 114 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.