Violation of government directivesकोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या शासन निर्देशांचे उल्लंघन करुन मोठ्या संख्येने लोक जमवून विवाह समारंभ केल्याप्रकरणी आणि लग्नाचा हॉल भाड्याने दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन उदय भागवत (रा. घोरपडे नाट्यगृहासमोर) व महेश सेवा समितीचे अध्यक्ष  रामनिवास मुंदडा यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सध्या सर्वत्र कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाकडून पुन्हा उपाययोजना म्हणून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करुन महेश सेवा समिती येथे लग्नसोहळ्यासाठी 100 ते 150 लोक जमले असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जावून माहिती घेतली असता कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक जमा असल्याचे दिसून आले. त्यामुळे पवन भागवत तसेच कोरोनचा माहिती असूनही हॉल भाड्याने दिला म्हणून रामनिवास मुंदडा यांच्यावर महाराष्ट्र कोविड नियम 11 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.