Thieves stab old couple
 

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी रविवारी (दि.१४) पहाटे अडीचच्या सुमारास  चार ठिकाणी घरफोडी(Burglary) करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व शेळ्या लंपास केल्या. दरम्यान, येथील एका वृध्द पती-पत्नीवर चोरट्यांनी चाकूने हल्ला(Attack) करून काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण(Beating) केली. हल्ल्यात वृध्द दाम्पत्य गंभीर जखमी(Injured) झाले.शिंगोरी येथील आबासाहेब यशवंत खंडागळे (वय ६०) व सुमन आबासाहेब खंडागळे (वय ५५) हे वृध्द दाम्पत्य रात्रीच्या सुमारास घरात झोपले असता, रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी 'आबा दार उघडा.

आम्हाला तहान लागली' अशी नावानिशी हाक मारली. तेव्हा आबासाहेब खंडागळे व त्यांच्या पत्नीस जाग आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहत 'बाहेरच पाणी आहे, ते प्या' असे सांगितले. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजा तोडण्याचा(break) प्रयत्न चालू केला.आबासाहेब खंडागळे यांना चोरट्यांचा अंदाज आल्याने ते घरात प्रतिकारासाठी साहित्य शोधू लागले. तेवढ्यात त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला. तेव्हा चार ते पाच चोरट्यांनी घरात घुसून चाकूने आबासाहेब खंडागळे यांच्यावर वार(War) केले. झटापटीत(hurry)त्यांच्या हात, छाती, डोळे व बरगड्यानजीक गंभीर जखमा(Wounds) झाल्या. 

----------------------------

Must Read

------------------------------


चोरट्यांच्या तावडीतून सुटून ते पळाल्याने थोडक्यात बचावले.  त्यांच्या पत्नीला चोरट्यांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील अंदाजे १ तोळे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले व घरातील रोख ७ हजार ५०० रूपये चोरून चोरट्यांनी आरडाओरडा झाल्याने तेथून पळ  काढला. जखमींना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात(hospital) हलविले.