अमरावती जिल्ह्याच करोना बाधित रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येत्या रविवारी एक दिवसासाठी संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील हा लॉकडाउन शनिवारी रात्री ८ वाजता सुरू होऊन तो सोमवारी सकाळी ७ वाजता संपेल. 

दरम्यान अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण वाढत आहेत. यामुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावायचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले होते.