ऑनलाइन टिम:
अमरावती : पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण (Classes) मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून देशात सहा राज्यांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून (finance) शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम (स्टार्स) याचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता प्रदान केली आहे.
महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यांत शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी ‘स्टार्स’ची प्रभावीपणे अंमलबजावणी (Implementation) केली जाणार आहे. राज्यात समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाखाली पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या (Student) दर्जेदार शिक्षणावर भर दिला जाणार आहे.
------------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष शनिवार,13 फेब्रुवारी २०२१
2)उत्कृष्ट जिल्ह्यांना ५० कोटींचा अतिरिक्त निधी- अजित पवार..!!
इयत्ता सहाव्या वर्गापासून व्यवसाय शिक्षण (Classes) दिले जाणार आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून अर्थसाह्य मिळणार आहे. ‘स्टार्स’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला मिळणारे अनुदान अदा करण्यासाठीचे निर्देशक ठरविण्यासाठी शगुन, पीएमएस, यूआयडीएसईमधील कामगिरीचा वापर करता येणार आहे.
अशी असेल समिती
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी समितीची रचना निश्चित करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अथवा मुख्य कार्यपालन अधिकारी (Officer) असतील. सदस्य म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ‘डायट’चे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी आणि निमंत्रित सदस्य केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे असतील.
ही आहेत ‘स्टार्स’ प्रकल्पाची उद्दिष्टे
पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण
शिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर
विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन व्यवस्थेत सुधारणा
शाळाबाह्य मुले, विशेष गरजा असणारी बालके, मुली आणि वंचित घटकांच्या समुदायातील विद्यार्थ्यांवर लक्ष