केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. “अर्थमंत्र्यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या स्थितीची कल्पना नसल्याचे दिसते. सीतारामन यांनी फक्त निवडणुका असलेल्या राज्यांकडे लक्ष दिले आहे” अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली.

याआधी कुठल्या बजेटने केली नव्हती, इतकी निराशा या बजेटने केल्याचे चिदंबरम म्हणाले. “निर्मला सीतारामन यांनी गरीब आणि स्थलांतरीतांची फसवणूक केली. निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांची फसवणूक केली, खासकरुन खासदारांची. त्यांनी पेट्रोल, डिझेलसह अनेक उत्पादनांवर उपकर लावले. प्रतिलिटर पेट्रोलवर २.५० रुपये तर प्रतिलिटर डिझेलवर चार रुपये. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी हा झटका आहे” असे चिदंबरम म्हणाले.