कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाचं अर्थसंकल्प संसदेत सादर केलं जातय. या बजेटवर सर्वांचं लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पाचा कोणाला फायदा होणार, तर कोणाला नुकसान. कोणाला काय मिळणार आणि काय नाही? एकीकडे संसदेत बजेट सादर होतंय तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोक मजेदार मिम्स शेअर करत आहेत.

सगळ्यांना माहितीये की कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लोकांना या अर्थसंकल्पातून लोकांना मोठ्या आशा आहेत.निर्मला सीतारमण यांनी आरोग्य यंत्रणेसंदर्भात मोठी घोषणा केलीये. या बजेटवर सोशल मीडियावरही खूप चर्चा होताना पाहायला मिळतेय. अर्थसंकल्पाबाबत, युजर्स मजेदार मिम्स शेअर करत आहेत.

मिम्सच्या माध्यमातून युजर्स उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि निम्न वर्गाची तुलना करत आहेत. तुम्हीसुद्धा हे मजेदार मिम्स पाहून हसणं थांबवू शकणार नाही. तर, पाहूया बजेटवर मध्यमवर्गाची प्रतिक्रिया काय आहे.